पिपरी (देश) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळा,आरोग्य शिबीर आणि स्वच्छता अभियान संपन्न..!
भद्रावती (ता.प्र.) - दिनांक १४,१५ आणि १६ नोव्हेंबर रोजी पिपरी(देश) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.१४ नोव्हेंबर रोजी श्रध्येय बाबा आमटे आरोग्य अभियान आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट,चंद्रपूर यांच्या सयुक्त _विद्यमाने भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यात ६०० नागरिकांचा उपचार करण्यात आला.यावेळी श्री रवींद्र शिंदे,श्री धनराज अस्वले,श्री मांडवकर,श्री भास्कर ताजने,सौ अर्चनाताई नांदे,सौ सविता जमदाले,श्री सुनील मोरे,श्री प्रवीण आवारी,श्री विनोद ठोंबरे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच १२५ नागरिकांना उपचारासाठी सावंगी (मेघे) येथे पाठवण्यात येणार आहे.१५ नोव्हेंबर रोजी घटस्थापना करण्यात आले तसेच गावाची स्वच्छता करण्यात आली.श्री खेमराज महाराज यांच्या उपस्थितीत भजनाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली,यावेळी कोची, घोनाड,भद्रावती, पूनवट,कुर्ली,भद्रावती आणि गावातील भजन मंडळ उपस्थित होते.लगेचच विविध उद्योग आणि भविष्यातील रोजगारांच्या संधी याबद्दल उद्योजक श्री रमेशजी राजूरकर यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.४.५८ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सायंकाळी ७ वाजता ह.भ.प सरोजनी ताई चांदेकर मॅडम यांचे कीर्तन पार पडले.९ ते १२ वाजेपर्यंत सप्तखंजरी वादक श्री संघपाल महाराज यांच्या कीर्तनाचा लाभ जनतेने घेतला.
१६ नोव्हेंबर रोजी ग्रामसफाई करून रामधून काढण्यात आली. ॲड वामनराव चटप यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता ग्रंथावर विस्तृत असे मार्गदर्शन केले,तसेच शेतकऱ्यांवर होत असलेले अन्याय त्यावरील उपाय आणि विदर्भ राज्य वेगळे होणे का गरजेचे आहे यावर मार्गदर्शन केले.डॉ दिलीप चौधरी सर यांनी ग्रामगीता,युवक,गाव,शिक्षण अश्या अनेक विषयांवर सखोल असे मार्गदर्शन केले.श्री नरेन्द्र जीवतोडे यांनी ग्रामसभा आणि गावांचा विकास कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.तसेच गावात दारूबंदी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ह.भ. प खिरटकर महाराज यांनी काल्याचे कीर्तन केले आणि लगेच महाप्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी संपूर्ण गावाचे वातावरण भक्तिमय झाले होते.तीन दिवसीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वभौम अध्यक्ष श्री पंढरी कुटेमाटे,सचिव श्री संदीप कुटेमाटे,गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष श्री सचिन नांदे,सचिव योगेश मत्ते,श्री अमोल क्षीरसागर,श्री पद्माकर क्षीरसागर,शंकर नांदे,मोहन दर्वे,योगेश कुटेमाटे, अक्षय कुटेमाटे,मारोती दर्वे,राहुल कुटेमाटे,श्री संदीप कुटेमाटे,सौ रुचिता कुटेमाटे,सौ गीता कुटेमाटे,सौ विश्रांती कुटेमाटे,सौ सुषमा ढवस तसेच गावातील पुरुष,महिला,युवक, युवती आणि बालगोपालांनी परिश्रम घेतले.

