भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावती येथे कॉपीमुक्त अभियान शिबिर व पालक मेळावा संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्रमुख अतिथी म्हणून स्वाध्याय परिवाराचे भद्रावती समन्वयक श्री देवराव काळबांधे हे उपस्थित होते .
विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.जयंत वानखेडे यांनी तणाव मुक्त अभ्यास, सातत्यपूर्ण अभ्यासाचा सराव, परीक्षेची अनामीक भीती व तणाव, त्यावर उपाययोजना इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांना येतोचित मार्गदर्शन करण्यात आले.विद्यापीठीयन परीक्षेला सामोरे जातांना आत्मविश्वासाने,न घाबरता परीक्षा द्याव्यात असा मंत्र दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद पाठक तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. रेणुका गायकवाड यांनी केले. प्रशासकीय सेवा महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.
