भद्रावती (ता. प्र.) - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती येथील मुलींनी तायकांदो या खेळात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कडून कलरकोट प्राप्त केला. तायक्वांदो या खेळात शिंदे महाविद्यालय भद्रावती मधून नूतन शरद कोरडे (एम.एस्स.सी भाग-१) सोनाली कौशल बावणे (बि.एस्स.सी भाग-१) प्रगति सुरेश हेलवटे (बि.एस्स.सी भाग-२) प्रेरणा नत्थु कुत्तरमारे (बि.एस्स.सी भाग-३) तसेच मुले खेळाडुंमधुन साईवांशी यादगिरी अल्लकाटला (बि.एस्स.सी भाग-३) दिलीप पतरंगे (बि.एस्स.सी भाग-३) मयूर विशाल गौरकार (एम.एस्स.सी भाग-१) संजू सुधाकर पाटील (बि.एस्स.सी भाग-३) सदर मुले-मुली खेळाडूंनी यश संपादन केले. या खेळ प्रकायात श्री. सतीश खेमस्कर, श्री. श्याम खेमस्कर, श्री. तुषार दुर्गे, अमलोश कुमरे, जितेंद्र केळझरकर, प्रणाली पिंपळकर, सूरज दखणे यांचे मार्गदर्शन लाभले असून नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत तायकांदो स्पर्धेत आँल इंडिया कलर कोट करिता सदर खेळाडूंची निवड झाली. व सदर खेळाडूंना स्वर्ण पदक प्राप्त झाले. गुरूंनानक देव विद्यापीठ, अमृतसर येथे भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा होत असून या ठिकाणी खेळण्याकरिता सदर खेळाडू जाणार आहेत. व त्या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे प्रतिनिधित्व करणार आहे. आपल्या यशाचे श्रेय शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ.विशाल शिंदे, श्री. अजीज शेख यांना दिले आहे. खेळाडूचा भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व महाविद्यालयाच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला असून यावेळी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव प्रा. डॉ.विशाल शिंदे, प्राचार्य डॉ.एल.एस.लडके, श्री. अजय आसुटकर, प्रा.डॉ.कुंदन सहारे, प्रा. डॉ. अपर्णा धोटे प्रा.डॉ. शशिकांत शित्रे, श्री.विशाल गौरकार, श्री. खुशाल मानकर, श्री.किशोर जथाडे, श्री.शरद भावरकर, श्री. प्रमोद तेलंग श्री.पांडुरंग आखतकर, श्री. बंडू पेंदोर उपस्थित होते. व पुढील वाटचाली करिता खेळाडूंना सुभेच्छा देण्यात आल्यात.
शिंदे महाविद्यालयातील खेळाडूंना तायकांदोत कलरकोट.!
byChandikaexpress
-
0
