लोकमान्य विद्यालयाचे विधीशा व सोहम शिष्यवृत्ती तथा नवोदय परीक्षेत पात्र..!

भद्रावती (ता.प्र.) - लोकसेवा मंडळ भद्रावती संचालित लोकमान्य विद्यालयl तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी सोहम पंढरी खिरट कर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र ठरला. तसेच याच विद्यालयाची विद्यार्थिनी विधीशा संजय दोडके जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत पात्र ठरली आहे.यावर्षी सोहम हा इयत्ता नववीचा तर विदेशा इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आहे. या दोघांचेही यशाबद्दल लोकसेवा मंडळ भद्रावती तथा लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव मनोहरराव पारधे, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्कर वार, सहसचिव नामदेव कोल्हे, सदस्य तथा माजी प्राचार्य गोपाल ठेंगणे, अविनाश पाम्पट्टीवार, विनोद पांढरे, प्राचार्य आशालता सोनटक्के, उपप्राचार्य सचिन सरपटवार, पर्यवेक्षक रूपचंद धारणे रमेश आसेकर तथा सर्व शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".