शिंदे महाविद्यालयाच्या गौरवात मानाचा तुरा.!
भद्रावती (ता. प्र.) - क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील प्रेम पचारे हा खेळाडू 19 वर्ष वयोगटाखालील मुलांच्या तलवारबाजी या क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आला. जिल्हा स्तरावर प्रथम येवून विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे.
विभागीय स्तरावर होणाऱ्या तलवारबाजी स्पर्धेसाठी भद्रावतीचा हा खेळाडू चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या या घवघवित यशाबद्दल व विभागीय स्तरावर निवडीबद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव प्रा. डॉ. विशाल शिंदे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे , डॉ. ज्ञानेश हटवार ,क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण, माधव केंद्रे, किशोर ढोक, शेखर जुमळे तसेच समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले. विभागीय स्तरावर होणाऱ्या तलवारबाजी स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामिण भागातील खेळाडू ने मिळवीलेल्या यशाचे बद्दल त्याचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.
