प्रकल्प स्पर्धा आविष्कार २०२२ चे यशस्वी आयोजन .!

भद्रावती (ता. प्र.) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारा अंतर्गत श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय, भद्रावती (एसएससीईटी) येथे प्रकल्प स्पर्धा आविष्कार २०२२ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ भद्रावतीचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सचिन सरपटवार, SSCET चे प्राचार्य डॉ.विनोद गोरंटीवार, डीन डॉ.विनोद नायर यांच्या उपस्थितीत प्रकल्प स्पर्धेच्या उद्घाटन करण्यात आले.
या प्रकल्प स्पर्धेत एकूण ३० विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या प्रदर्शनातून सहभाग घेतला. या प्रकल्प स्पर्धेत सर्व विभाग प्रमुखांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनोद एस. गोरंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. या प्रसंगी सर्व आदरणीय पाहुणे येरगुडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या अध्यक्षा माननीय सौ. प्रा. व्ही. व्ही. येरगुडे मॅडम, सचिव अमित येरगुडे, उपाध्यक्ष अभिषेक येरगुडे, प्राचार्य डॉ.विनोद गोरंटीवार, डीन डॉ.विनोद नायर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. समन्वयक डॉ.जगदीश्वर प्रसाद एस. त्रिपाठी, आयक्यूएसी डीन प्रा. वर्षा एच.सादरानी, प्रा. दिनेश डी. मजुमदार यांनी सर्व पाहुणे आणि महाविद्यालय व्यवस्थापनाचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".