शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू जिल्ह्यावर..!



भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती येथे शालेय तालुका क्रीडा स्पर्धा तालुका क्रिडा संकुल येथे सुरू आहेत. विविध क्रिडा स्पर्धेत यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी तालुक्यात विजयी होवून जिल्ह्यावर पोहचले.
बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत 19 वर्षाखालील वयोगटात भद्रावती येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडू कु.प्रिंसेस दासरी हिने तालुक्यात झालेल्या बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत सर्व स्पर्धकांवर मात करून ती तालुक्यात प्रथम आली. जिल्हास्तरावर होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत ती आता भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच 19 वर्षे वयोगटातील याच कनिष्ठ महाविद्यालयाचा उदय आस्वले हा खेळाडू सुद्धा तालुक्यात अव्वल आला असून जिल्हा क्रीडा स्पर्धेत भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे .17 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालयाचा ध्रृव गडीया हा खेळाडू तालुक्यात प्रथम आला असून,तो सुद्धा जिल्हास्तरावर नेतृत्व करणार आहे .
19 वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत यशवंतराव शिंदे क. महाविद्यालय भद्रावती येथील कबड्डी संघाने चोरा येथिल संघासोबत झालेल्या कबड्डी स्पर्धेत कडवी झुंज देत विजय संपादन केले. तर अंतिम सामन्यात लोकमान्य क. महविद्यालय भद्रावती या संघाचा एकतर्फी दारून पराभव केला. यशवंतराव शिंदे क. महाविद्यालयाच्या कबड्डी संघाने पंचवीस विरुद्ध पाच अशा गुणांनी एकतर्फी विजय संपादन केला.
या कनिष्ठ महाविद्यालयाचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत भद्रावती तालुक्याचे नेतृत्व करणार आहे.
विविध क्रीडा प्रकारात विजय संपादन केलेल्या खेळाडूंचा भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव प्रा. डॉ. विशाल शिंदे,यशवंतराव शिंदे क. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, क्रिडा शिक्षक रमेश चव्हाण, डॉ. ज्ञानेश हटवार, डॉ. सुधीर मोते, माधव केंद्रे, किशोर ढोक, समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".