भद्रावती (ता.प्र.) - आंतर विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे प्रतिनिधित्व करण्याचा मान शिंदे महाविद्यालय भद्रावती ला प्राप्त झाला आहे. भद्रावती येथिल निळकंठराव शिंदे महाविद्यालय येथील विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठातर्फे खेळणार आहेत. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आंतर महाविद्यालय खो-खो (मुले/मुली) स्पर्धेत निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती येथील खो-खो (मुली) स्पर्धेत कु. एकता अनिल खंदळकर बी.एस्सी. (भाग-२) ह्या विद्यार्थिनीने ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान झालेल्या डॉ. हरिसिंघ गौर विश्वविद्यालय, सागर. मध्यप्रदेश येथे झालेल्या पश्चिम क्षेत्र विभाग करिता गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले.
तसेच खो-खो (मुले) स्पर्धेत प्रशांत ओदेश बडगुरवार बी.ए. (भाग-१) या खेळाडूचे सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद येथे ०३ ते ०७ डिसेंबर २०२२ रोजी होणार्या पश्चिम क्षेत्र विद्यापीठ करिता गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यांच्या खेळातील ऊत्तम नैपुण्या बद्दल या खेळाडूंना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली कडून कलर कोट देऊन सन्मान मिळणार आहे. महाराष्ट्रात होणार्या अश्वमेध स्पर्धेकरिता या खेळाडूंची निवड सुध्दा झालेली आहे.
या अतुलनीय यशाचे श्रेय खेळाडूंनी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विशाल शिंदे यांना दिले.तसेच या खेळाडूंना प्रशिक्षक युवराज भारती, दीपक कावटे, संतोष निंबाळकर (द्रोणाचार्य सांस्कृतिक क्रीडा मंडळ, भद्रावती) यांचे मार्गदर्शन मिळाले.
या खेळाडूंना भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे, संस्थेचे सहसचिव डॉ. विशाल शिंदे, संस्थेचे सदस्य प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, यांनी सत्कार केला. यावेळी प्रा. रमेश चव्हाण, प्रा. गजेंद्र बेंद्रे, डॉ. नरेंद्र हरणे, डॉ. अपर्णा धोटे, डॉ. दहेगावकर, डॉ. वाढवे, डॉ. शशिकांत शित्रे, डॉ.नासरे, प्रा.प्रधान, श्री.अजिज शेख श्री.अजय आसुटकर, श्री.विशाल गौरकार, श्री.किशोर जथाडे, श्री.शरद भावरकर, श्री. पांडुरंग आखतकर, श्री. खुशाल मानकर, श्री. प्रमोद तेलंग हे प्रामुख्याने उपस्थित होते. व पुढील होणार्या पश्चिम क्षेत्र विद्यापीठ स्पर्धेकरिता सुभेच्छा देण्यात आल्यात.

