नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न ..पाचशे रुग्णांची तपासणी, सात पात्र रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया ..!
भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शहराचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विदर्भ साहित्य संघ व झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचा सन्मान चिन्ह,शाल,पुष्पगुच्छ देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील या दोन्ही संस्थांना सदोदित सहकार्य करून प्रोत्साहन देत असतात. या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
शहरातील राजवंदन सभागृहात दिनांक 10 रोज गुरुवारला एका भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ शहरातील पाचशे रुग्णांनी घेत शिबिरात आपल्या विविध रोगांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून घेतली. यात 299 महिला तर 201 पुरुषांचा समावेश होता.
या शिबिरात शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सात रुग्णांवर ग्रामीण रुग्णालय भद्रावती व वरोरा येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे .यात पाच हायड्रोसिल तथा दोन हर्निया रुग्णांचा समावेश आहे. या शिबिरात त्वचा विकार, कॅन्सर , उच्च रक्तदाब, मधुमेह ,बाल रोग, महिला रोग, दंतरोग, हृदयरोग ,आदी विविध रोगांवर मोफत उपचार करून रुग्णांना औषधीचे मोफत वाटप करण्यात आले. प्रथम मित्र मंडळाद्वारे सभागृहात केक कापून नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, वंदना धानोरकर, वच्छलाताई धानोरकर, वि.सा. संघाचे अध्यधक्ष डॉ.सुधिर मोते, सचिव डॉ. ज्ञानेश हटवार ,डॉ. सुरेश परसावार, प्रविन आडेकर,अनिल पिट्टलवार, शालिक दानव, पांडुरंग कांबळे, रमेश भोयर व समस्त पदाधिकारी तसेच रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर माला प्रेमचंद , सुधीर पारोधे होते.
सदर आरोग्य तपासणीसाठी विविध तज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. यात जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर पथक, एन. सी. डी., कॅन्सर पथक, आय.सी.डी.सी., आर.बी.एस.के. डाटा ग्रुप आदि पथकामधील तज्ज्ञांचा समावेश होता. दंतचिकित्सक म्डॉक्टर प्रवीण केशवानी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनीष सिंग, डॉक्टर नितीन सातभाई हे उपस्थित होते.
सदर शिबिराच्या यशस्वीते करता मित्र मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.
