भद्रावती (ता.प्र.) - विवेकानंद माध्यमिक विद्यालय, मांगली (रै.)येथील विद्यार्थांची महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने पारंपरिक लोकनृत्य, वादन, खेळणी तयार करणे या स्पर्धाचे आयोजन केले होते. जिल्हा स्तरावर स्पर्धेकांचे व्हिडीओ क्लिप पाठविण्यात आले. त्यामधून कु. वर्षा रमेश कोडापे हिची पारंपरिक लोकनृत्यात तर कु. कल्याणी पुरुषोत्तम काकडे हिची खेळणी तयार करणे यामध्ये निवड झाली तर वाद्य वादनामध्ये कुणाल दिनेश मरसकोल्हे या सर्व विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावर झालेली आहे.
पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता दि.22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत सेंट उर्सूला हायस्कूल, सिव्हिल लाईन, नागपूर येथे सादरीकरणासाठी जाणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाल्याने या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मान. मो. वि. टेमुर्डे साहेब व सचिव मान. श्री. अमन टेमुर्डे साहेब तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी स्पर्धेकांचे कौतुक व अभिनंदन केले. सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. झेड. लांबट, शिक्षक वृंद कल्पना ठावरी, सरिता तल्लारवार, श्री अजय धात्रक,श्री. सचिन काकडे व इतरेतर कर्मचारी घुगल, निब्रड, पाटील, नैताम या सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले व सर्वांनी मुलांचे कौतुक व अभिनंदन केले. यासोबतच पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी मान.डॉ. प्रकाश महाकाळकर सर , विस्तार अधिकारी श्री. थुल सर व इतर कर्मचारी आणि BRC च्या वतीने प्रतिभा कवाडे मॅडम यांनी यशस्वी स्पर्धेकांचे अभिनंदन केले. सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हे अद्वितीय यश पाहून परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.