नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य आरोग्य शिबीर.!

भद्रावती (ता.प्र.) - शहरातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांना त्यांच्या रोगांचे योग्य निदान होऊन त्यांना योग्य औषधोपचार व्हावा व गरज भासल्यास त्यांची मोफत शस्त्रक्रिया व्हावी यासाठी भद्रावती नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शहरातील बाजार मंडी जवळील राजवंदन सभागृहात दिनांक 10 नोव्हेंबर रोज गुरुवारला सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराला फिजीसीयन, शल्य चिकित्सक, बालरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ ,अस्थिरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ ,दंतरोग चिकित्सक व नाक ,कान ,घसा चिकित्सकांची उपस्थिती राहणार आहे. या शिबिरात मधुमेह, उच्च रक्तदाब, तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर , थायरॉईड, अंडवृद्धी, हत्ती पाय रोग ,आदी विविध रोगांची तपासणी व निदान करण्यात येणार आहे. शिबिरात शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे औषधी सुद्धा मोफत देण्यात येणार आहे .शिबिरामध्ये शालेय मुलांची आरोग्य तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे. शिबिराच्या दिवशी सकाळी 9.30 वाजता रुग्णांची नोंदणी करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आव्हान शिबिराच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".