रुबीना मिर्झा यांची अध्यक्षपदी निवड ..!

बल्लारपुर (का.प्र.) - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने डा.एडवोकेट रूबीना यास्मीन मिर्जा यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.श्री.नाना भाऊ पटोले यांच्या मार्गदर्शना खाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काम सातत्याने व प्रामाणिक पणे करत असल्याने तसेच पक्षाचे विचार, ध्येय व धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य डा.एडवोकेट रूबीना मिर्जा करित असून जिद्धीने व निष्ठेने प्रमाणिकपने सतत कार्य करीत असल्याणे त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेश अध्यक्ष योगेश मसलगे पाटील यांच्या वतीने चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या चंद्रपुर जिल्हा “शहर अध्यक्ष " या पदी रुबिना मिर्झा यांची निवड केली आहे.
     खासदार बाळुभाऊ धानोरकर यांचे चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात बाळुभाऊ धानोरकर यांचे हस्ते रुबिना यास्मिन मिर्झा यास हे नियुक्तीपत्र देण्यात आले .नियुक्तीपत्र देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद रमज़ान अली सह कांग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सोहैल रज़ा शेख सह अनेक मान्यवर प्रामुख्याने हजर होते.
    भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचाराने सर्व सामान्यासाठी पक्ष कार्य करावे व आपल्या पक्षाची प्रतिमा उज्वल करावी असे नियुक्ति पत्राच्या मांध्यमातुन कळविण्यात आले असून रुबिना यांनी आपले नियुक्तीचे श्रेय खासदार बाळूभाऊ धानोरकर ,माजी मंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार,आमदार सुभाष धोटे,आमदार प्रतिभाताई धानोरकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद रमज़ान अली ,रोजगार विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आश्विन शाह,काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सोहेल रज़ा शेख यांना दिले असून अनेक स्तरावरून रुबीना मिर्झा यांचे कौतुक केले जात असून लवकरच शहर कार्यकारिणी गठित करण्यात येईल अशी माहिती रूबिना यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".