राष्ट्रवादी नेता व सामाजिक कार्यकर्ते रवी बेज्जला यांनी मातोश्री वृद्धाश्रम येथे केला वाढदिवस साजरा.!
बल्लारपुर (का. प्र.) - चार पैसे जमा झाले की वेगवेगळ्या वाटेने ते कसे खर्च करायचे याबाबत हरहुन्नरी नागरिक वेगवेगळे मार्ग शोधतात. मग, कारण कोणतेही असो. वाढदिवस साजरा करणे ही तर आज फॅशन झाली आहे. मग यासाठी कितीही खर्च झाला तरी चालतो. पण या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन बल्लारपूर येथील राष्ट्रवादी नेता व सामाजिक कार्यकर्ते रवी भाउ बेज्जला यांनी आपला वाढदिवस बल्लारपूर विसापूर मार्गावरील मातोश्री वृद्धाश्रमात साजरा केला.
वाढदिवसाला होणारा खर्च वृद्धाश्रमाला देऊन सर्व वृद्धांना अन्नदान व सर्व वृद्धांना ब्लॅंकेट दिले. वृद्धाश्रमास अन्नदान व ब्लॅंकेट देणाऱ्या रवी भाउ बेज्जला व त्यांच्या मित्र परिवार यांचे कौतुक होत आहे. 'डिजे'च्या तालावर मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्टीचे नियोजन करून वाढदिवस साजरे करताना पहायला मिळते. यावर लाखो रुपयांची उधळपट्टीही होती. याला बगल देत रवी बेज्जला यांनी वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरविले.
संपूर्ण दिवस या वृद्धासमवेत घालवून त्यांच्या दु:खावर फुंकर घालून आनंदी वातावरण निर्माण केले.

