राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती सावित्रीबाई फुले वाचनालयात साजरी .!
वणी (वि. प्र.) - छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ तसेच युवकांना चारित्र्यसंपन्न आणि ध्येयवादी आयुष्यासाठी प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय विठ्ठलवाडी, वणी येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिजाऊ बिग्रेडच्या अध्यक्ष मा.सौ.भारती राजपूत मॅडम तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाचनालयचे अध्यक्ष मा.श्री. बाळासाहेब राजूरकर सर आणि मा.सौ. मायाताई आसुटकर मॅडम यांनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ वंदना घेण्यात आली. विचारपीठावर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांचे आदर्श मूल्य वाचकांना समजावून सांगितले. यावेळी सचिव श्री.बोबडे सर,कोषाध्यक्ष श्री.चौधरी सर,संचालक श्री.बोबडे सर,श्री.टोंगे सर,श्री.पाटील सर,श्री.मोहितकर सर,सहा. ग्रंथपाल श्री.कडू ,जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी व सदस्या आणि वाचनालयातील वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सौ.रंजना जीवतोडे मॅडम तर आभार मा.सौ. किरण गोडे मॅडम यांनी मानले.
