भद्रावती (ता. प्र.) - माता महाकाली बहुउद्देशीय शिक्षण प्रसारण मंडळ चंद्रपूर द्वारा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भद्रावती येथिल तरूण समाज सेवक श्री. विक्रांत राजेश बिसेन यांचा सत्कार खासदार सुरेश धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
भद्रावती येथे आयोजित एका कार्यक्रमात अध्यक्ष युथ अगेन्स्ट करपशन एंड बहुउद्देशीय सोशल वर्क फाउंडेशन भद्रावती तसेच मराठी विश्वज्ञानरंजन वाचनालय व अभयासीकेच्या माध्यमातून विक्रांत बिसेन यांनी सत्तरच्या वर अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शासकीय सेवेत नोकरी तसेच स्वयंरोजगार मिळवून दीले.
तसेच श्री बिसेन कम्प्युटर एजुकेशनचे संचालक व रोटरी क्लब चे सदस्य यानी अनेक संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात होत असलेल्या विविध समाजसेवा, रुग्णसेवा, मोफत रोजगार व रोजगार सक्षम प्रशिक्षण देणे , मार्गदर्शन करणे, विविध विषयवार शिबीर घेवून जनजागृती करने, जनहितार्थ कामा साठी धावून जाणे, गोरगरीबांना मोफत पुस्तके, स्पोर्ट कीट, खेळाडू साठी स्पोर्ट चे साहित्य मिळवून देणे. कोरोना काळात जन सेवा व इतर सामाजीक सेवा संस्था मार्फत गरजवंताला धान्य कीट पुरविणे अशी अनेक सेवा कामे केली .
संस्था, फाउंडेशन, अभ्यासीके च्या माध्यमातून होत असलेल्या अनेक सामाजिक कार्य ची दखल घेऊन वणी आणीॅ क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर व वरोरा भद्रावती क्षेत्राचे आमदार. सौ. प्रतिभाताई धानोरकर यांनी 9 जानेवारी 2022 ला माता महाकाली बहुउद्देशीय शिक्षण प्रसारण मंडळ चंद्रपूर द्वारा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विक्रांत बिसेन सरांचा सत्कार करण्यात आला. जीवनात यानंतरही असे समाज कार्य त्यांच्या हस्ते होत राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना त्यांनी केली. या कार्यक्रमात आयोजकांनी त्यांना बोलवून सन्मान केल्याबद्दल त्यांनी सगळ्यांचे आभार मानले.
तसेच व्यासपीठावर असलेले लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सौ प्रतिभाताई धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल भाऊ धानोरकर, तसेच या कार्यक्रमात उपस्थित सर्व मित्र व मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.
