समाजाने महापुरुषांच्या आदर्शाचा अंगीकार करावा - डॉ.ज्ञानेश हटवार

 
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांची जयंती संपन्न .!
बल्लारपुर (का. प्र.) - छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, भारतीय संस्कृतीचे महत्व संपूर्ण जगाला पटवून देणारे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे संपन्न झाली . याप्रसंगी मार्गदर्शन करताना "विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श जीवनात बाळगावा व आपले व्यक्तिमत्व विकसित करावे "असे मार्गदर्शन डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले. 
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचलित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जयंती महोत्सव संपन्न झाला.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाठक , मार्गदर्शक  डॉ. ज्ञानेश हटवार , डॉ. सुधीर मोते, किशोर ढोक हे व्यासपीठावर उपस्थित होते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण  करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत पाठक यांनी स्वामी विवेकानंदांचा विचार आचरणात आणण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले , तर डॉ. सुधीर मोते यांनी राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन आपण मुलांवर संस्कार द्यावे असे मार्गदर्शन केले . याप्रसंगी निलेश कुलसंगे, वैभव मगरे, साक्षी ठावरी, पूजा हनवते ,सुहानी शिरपूरकर  आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किशोर ढोक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कु. स्नेहल चौधरी यांनी केले , तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शुभम टोंगे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. प्रेमा पोटदुखे , संगिता जक्कूलवार , माधव केंद्रे, विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".