राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.!

छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय कोंढा येथे हिंदवी स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.!
भद्रावती (ता.प्र.) - दि.12/01/2023 रोज गुरूवार ला छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय कोंढा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव श्री.रमेशराव पायपरे सर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथि म्हणून श्री अजयकुमार विधाते सर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याच सोबत वर्ग 6 वीची विदयार्थीनी कु.श्रावणी जिवतोडे हिने मी जिजाऊ बोलते हि एकपात्री नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे मुख्य अतिथि श्री अजयकुमार विधाते सर यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री रमेशराव पायपरे सर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन सौ वनिता तितरे मॅडम यांनी तर आभार कु. उर्मिला निखाडे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".