ना.सुधीर मुनगंटीवार यांनी कोल्हापुरी चप्पल देऊन केला गुंडावार यांचा सत्कार .!
भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती येथील रामभक्त चंद्रकांत गुंडावार या कार सेवकानी सहा डिसेंबर 1992 च्या कारसेवेत अयोध्येत राम मंदिरासाठी पादत्राणे त्याग करण्याचा निर्धार केला होता. तब्बल 31 वर्ष पर्यंत त्यांनी राम मंदिरासाठी अनवाणी प्रवास केला.
जोपर्यंत अयोध्येत भव्य राममंदिर होणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा संकल्प होता.आता काही दिवसातच अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्णत्वास जाणार आहे. भद्रावती येथील चंद्रकांत गुंडावार यांची इच्छाशक्ती व त्यागाची भावना यांचा आदर करून यासाठी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत चांदा क्लब मैदान चंद्रपूर येथे राम जन्मोत्सव समिती तर्फे राज्याचे वन तथा सांस्कृतिक मंत्री तसेच जिल्हा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार व सपना मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रकांत गुंडावर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सत्कारात त्यांना कोल्हापुरी पादत्राणे, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलेे. याप्रसंगी व्यासपीठावर रामायण मालिकेतील राम, सीता व लक्ष्मणाची भूमिका साकारणारे करून अरुण गोविल, दीपिका चिखलिया व सुनील लहरी तथा उत्तर प्रदेशातील मंत्री व प्रसिद्ध गायक कैलास खैर हे उपस्थित होते.
अयोध्येतील राम मंदिरासाठी बल्लारपूर येथील लाकूड निवडण्यात आले. काष्ठ पूजनाच्या निमित्ताने चंद्रपूर येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यापूर्वीच 25 डिसेंबर 2019 ला अयोध्येला जाऊन गुंडावार यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले होते. आजही ते तिन्ही ऋतूंमध्ये खाजखळग्यांच्या रस्त्यावरून अनवाणी चालतात. इच्छाशक्ती व त्यागाची भावना असेल तर हे सगळं साध्य होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे. एका मोठ्या सोहळ्यात चंद्रकांत गुंडावार या त्याग मूर्तीचा सत्कार करण्याचा शब्द ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता . आज तो शब्द त्यांनी पूर्ण केला. ना.सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय मोठ्या अशा कार्यक्रमात चंद्रकांत गुंडावार यांना कोल्हापुरी चप्पल देऊन त्यांचा सत्कार केला.
एका मोठ्या कार्यक्रमात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी कोल्हापुरी चप्पल देऊन माझा सत्कार केला. कोल्हापुरी चप्पल परिधान करण्यासाठी दिली. मात्र मी अयोध्येत जाऊन राम मंदिराचे दर्शन घेऊनच ही चप्पल परिधान करणार असल्याचे चंद्रकांत गुंडावर यांनी सांगितले. तसेच या सर्व प्रवासात माझे कुटुंब माझ्या सोबत होते,असेही त्यांनी सांगितले.
सत्कार करते वेळी बळवंतदादा गुंडावार, अलका गुंडावार, नीता गुंडावार, अमित गुंडावार, धनश्री गुंडावार, प्रदीप गुंडावार व अन्य गुंडावार कुटुंबीय उपस्थित होते.