'केवल सम्राट अशोक लौट रहे हैं और बाकी सब कलिंग का पता पुछ रहे हैं' .!
भद्रावती (ता.प्र.) - समता सैनिक दल शहर तथा तालुका शाखा भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३२७ व्या जयंतीचे औचित्य साधून सुखम बुद्ध विहार, हनुमान नगर, बंगाली कॅम्प येथे अत्यंत उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राज्य प्रोग्रामर टीमचे सदस्य मार्शल कमलाकर काटकर उपस्थित होते. आणि प्रमुख उपस्थिती अविनाश दिग्विजय व भद्रावती तालुक्याचे संघटक मार्शल हर्शल रामटेके हे उपस्थित होते. सदर दोन्ही कार्यक्रमांत सन्माननीय पाहुण्यांनी चक्रवर्ती सम्राट अशोक, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेत, दिप प्रज्वलीत करून बुद्ध वंदना घेण्यात आली. एक प्रजादक्ष राजा म्हणून जनमाणसात मानवतावादी मुल्य प्रस्थापित करण्यासाठी सम्राट अशोकांनी अत्यंत कठोर परिश्रम घेऊन इतिहासात भारताला अजरामर केले. बौद्ध धम्माला राजाश्रय देत असताना इरान-इराक पासून तर कन्याकुमारी पर्यंत चौ-यांशी हजार विहारं, स्तुप, चैत्य, स्तंभ, आणि लेण्या तयार केल्या, अनेक ठिकाणी शिलालेख कोरलेलत, देशविदेशात आपल्या कुटुंबियांना पाठवुन बौद्ध धम्म या भुमीवरती कायमस्वरूपी स्थापित केला. भारताचा इतिहास हा सम्राट अशोकांशीवाय पुर्ण होऊच शकत नाही. असं असतानाही सम्राट अशोकांवर ब्राम्हणी इतिहासकारांनी अनेक शतके लिखाण केलेले नाही आणि ज्यांनी ज्यांनी लिखाण केले त्यांनी इतिहास प्रदुषित करून बदनाम करण्यापलीकडे काहीच केले नाही. एवढ्या मोठ्या चक्रवर्ती सम्राटांची, महापराक्रमी राजांची, मोठमोठ्या भिक्खुंची परंपरा आपल्याला लाभली असतांनाही आपल्या विहारांमध्ये, कार्यक्रमांमध्ये या आदर्शांची फोटो नाहीत ही मोठी खेदाची बाब आहे. आणि म्हणून समता सैनिक दल आग्रहाची भूमिका घेऊन जनमानसात ही कल्याणकारी संस्कृती रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत आहे. समता सैनिक दलाच्या माध्यमातून 'केवल सम्राट अशोक लौट रहे है और बाकी सब कलिंग का पता पुछ रहे हैं!' या उक्तीप्रमाणे भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा अनेक नाविण्यपूर्ण बाबींना यावेळी उजाळा देण्यात आला. यावेळी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद धोंगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मणिकुमार जाधव यांनी केले सरतेशेवटी सरणत्तय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सम्राट अशोकांबद्दल मिळालेल्या नाविण्यपूर्ण माहितीमुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले.