भद्रावती (ता.प्र.) - स्थानिक विवेकानंद महाविद्यालयास नॅक समितीने भेट देऊन महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्तेची तपासणी केली. ३१ मार्च आणि १ एप्रिल २०२३ या दोन दिवसीय भेटीत या चमुने महाविद्यालयातील विविध उपक्रमांची तपासणी केली. या समितीमध्ये उस्मानिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. रविंदर हे अध्यक्ष होते. तर समन्वयक डॉ. नरेश पटेल धरमसिंह देसाई युनिव्हर्सिटी नाडीयाड गुजरात, आणि सदस्य डॉ. एस. डी. पाटील श्रणबसवा युनिव्हर्सिटी कालबुरगी, कर्नाटक हे उपस्थित होते. या चमुने दोन दिवस महाविद्यालयातील शैक्षणिक तसेच संशोधनात्मक गुणवत्तेची तपासणी केली. नॅक मूल्यांकनात B++ (२.७८) ही श्रेणी बहाल केली. महाविद्यालयाची मूल्यांकनाची ही चौथी वेळ होती. यापूर्वी या महाविद्यालयास बी+ हा दर्जा प्राप्त होता. यावेळी महाविद्यालयाच्या गुणवत्तेत मौलिक सुधारणा झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात नॅक समन्वयक प्रा.मोहीत सावे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघ,पालक संघ यांच्यासह अनेकांनी मोलाचे सहकार्य केले. महाविद्यालयाच्या यशस्वितेबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा पदाधिकारी आणि सदस्यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.