आपले आरोग्य आपल्या हाती .!

 
विवेकानंद महाविद्यालयात उद्या आपले आरोग्य आपल्या हाती या विषयावर व्याख्यान .!

भद्रावती (ता. प्र.) - योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक - मित्र मंडळ आणि स्थानिक विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक १५ एप्रिल २०२३ रोज शनिवारला सकाळी १० वाजता "आपले आरोग्य, आपल्या हाती" या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुणे येथील सुप्रसिद्ध एम.डी. आयुर्वेद गोल्ड मेडलिस्ट डॉ.लक्ष्मीकांत कोर्तीकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या व्याख्यानात मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्ती बळकट कशी करावी? जटील व जुन्यात जुन्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार पद्धती कशी करावी? बिना ऑपरेशन मानवी शरीरातील आजार ठीक करावयाच्या पद्धती. भविष्यात गंभीर व मोठे आजार होऊ नये म्हणून वर्तमान काळातच कशी काळजी घ्यावी इत्यादी विविध मुद्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणार आहे. व्याख्यानानंतर निःशुल्क तपासणी व मार्गदर्शन होईल. तरी या कार्यक्रमास भद्रावती परिसरातील गरजू नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे व योद्धा संन्याशी पालक - मित्र मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मते तथा पदाधिकारी यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.