डॉ.बाबासाहेबांच्या कार्याचा आदर्श अंगीकारा - प्राचार्य डॉ.जयंत वानखेडे
भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती संपन्न झाली. यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे समान संधी केंद्र स्थापन करण्यात आले. सामाजिक न्याय विभाग, आयुक्त समाजकल्याण महाराष्ट्र शासन याच्या मार्गदर्शना नुसार या समान संबंधीे केंद्रामार्फत महाविद्यालयात सामाजिक समता पर्व राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणुन शिक्षणाचा प्रसार करणारे, सामान्यांना शिक्षणाचे दारे उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती 11/4/23 ला साजरी करण्यात आली. आज दिनांक 14/4/23 ला भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती समारोह आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. नरेश जांभुळकर तर प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे , प्रा. सौ. उज्वला वानखेडे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. आंबेडकर जयंती समारोह निमित्त प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तर प्राध्यापक सौ. उज्वला वानखेडे यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनावर स्वरचित काव्य वाचन केले. यावेळी प्रा. कमलाकर हवाईकर, राजेंद्र साबळे, संगीता जक्कुलवार ,सुहास कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधीर मोते यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश आसुटकर यांनी केले. कार्यक्रमाला समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.