चंद्रपुर - (वि..प्र.) विश्वभूषण भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३२ व्या जयंती निमित्त शरणमं बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेतर्फे भारतीय संविधान तसेच महामानवाच्या जीवनसंघर्षावरील पुस्तके व मसाला भाताचे वितरण सिस्टर कॉलोनी मेन रोड चंद्रपुर येथे करण्यात आले, या प्रसंगी विदर्भ संपादक पत्रकार बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष श्री सय्यद रमजान अली, हेल्पिंग हँड्स टिमचे संस्थापक श्री प्रदीप अडकिने,नेत्रकमल बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नेत्रा इंगुलवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री बाजीरावजी उंदीरवाडे,मानवाधिकार पार्टीचे राष्ट्रीय प्रभारी श्री तपन कुमार रॉय, डॉ जितेंद्र खोब्रागडे, ऍड.शैलेंद्र देशकर,श्री सिद्धार्थ सोनटक्के, श्री अनिल कुमार करवा,श्री प्रमोदभाऊ बोबडे तसेच शरणमं बहुउद्देशिय संस्थेचे मार्गदर्शक श्री शामरावजी तावाडे,सचिव श्री हर्षित भसारकर तथा संस्थेचे अध्यक्ष श्री शेखर तावाडे उपस्थित होते.