सरदार पटेल महाविद्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन .!
चंद्रपूर (वि. प्र. ) - स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात आज 14 एप्रिल 2023 ला महामानव भारतरत्न प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव श्री. प्रशांत शांतारामजी पोटदुखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. एम.काटकर व उपप्राचार्य स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला मार्लापन करून व मेणबत्ती प्रज्वलित करून भावपुर्ण अभिवादन केले.
याप्रसंगी बाबासाहेबांनी दाखविलेल्या अमूल्य मार्गावर आपण सर्वांनी चालण्याचा संकल्प करावा. असे विचार प्राचार्य डॉ . काटकर यांनी प्रकट केले. या कार्यक्रमास महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते अशी माहिती जर्नालिस्ट माधुरी कटकोजवार ने दिली आहे.