भद्रावती चोरा फाट्यावर घटणा .!
भद्रावती (ता. प्र.) - चंद्रपूर – नागपूर महामार्गावर भद्रावती जवळ चोरा -चंदनखेडा फाट्याजवळील महामार्गावर रेसर बाईक चा अपघात झाला असून, यामध्ये दोन मुलाचा मृत्यू झाल्याची खबर आली आहे.
दोघेही तरुण हे वरोरा शहरातील रहिवासी असून अपघात एवढा भंयकर होता की एकाचा जागेवर मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील एक तरुण हा पंचभाई व दुसरा तरुण हा अंकुश सुनील भडगरे वय 23 राहणार वरोरा याला चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
हे दोघेही मुले भद्रावतीला जात असताना अगदी भद्रावती जवळ हा अपघात घडला. अपघाताचे कारण अद्याप समजले नसुन पुढील तपास भद्रावती पोलीस करित आहेत.