अल्पसंख्यांक विभागाच्या "सचिव" पदी मा.श्री.स्वप्निल शेंडे यांची निवड .!

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी, अल्पसंख्यांक विभागाच्या "सचिव" पदी मा.श्री.स्वप्निल शेंडे यांची निवड .. !

बल्लारपुर (का.प्र.) - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. नुकत्याच रमज़ान ईद च्या दिवशी आलेल्या महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी मध्ये अल्पसंख्यांक विभागाची कार्यकारीणीची रचणा करण्यात आली. सदर कार्यकारणी मध्ये चंद्रपूर जिल्ह्याला महत्व पूर्ण सचिव पद मिळाले.
चंद्रपुरचे सामाजिक कार्यकर्ते, ख्रिस्ती समाजाचे नेतृत्व करणारे व समाज कार्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे चंद्रपूर क्रिश्चियन कॉलोनीतील मा.श्री.स्वप्निल शेंडे यांची निवड अल्पसंख्याक विभागाच्या सचिव पदी एकमताने करण्यात आली. या निवडीबाबत त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चंडिका एक्सप्रेस परिवारा तर्फे त्यांना मनापासून अभिनंदन व पुढ़ील वाटचाली करिता मनापासुन शुभेच्छा.!



Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.