1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ..
बल्लारपूर (का.प्र.) - 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू व्हावी म्हणून गेले 13 दिवस राज्य भरातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदान,मुंंबई येथे उपोषणाला माजी आमदार श्रीकांत देशपांडे व माजी आमदार दत्तात्रय सावंत सर, जुनी पेन्शन समन्वयक संघाच्या वतीने बसले होते. सूर्य आग ओकत असतांनाच भर उन्हात आपल्या हक्कासाठी ३ मे २३ ला उपोषण सुरु झाल्यापासून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.ज्ञानेश्वर म्हात्रे सर या आंदोलनास वारंवार भेट देत होते. आंदोलन कर्त्याची भेट घेत होते आणि सोबतच ह्या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष्य कसे वेधले जाईल व शासन जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिक्षण मंत्री मा.दिपकजी केसरकर साहेब यांची वारंवार भेट घेऊन सकारात्मक चर्चा करीत होते.
आंदोलनाचा 13 वा दिवस असताना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी काल सकाळ पासून मुख्यमंत्री साहेबांना भेटून काल कोणत्याही परिस्थितीमध्ये मिटिंग घडवून आणण्याचे प्रयत्न केले. माजी आमदार श्रीकांत देशपांडे सर, माजी आमदार दत्तात्रय सावंत व समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत काल सकाळी वर्षा बंगल्यावर भेट घेतली. तर दुपारी परत सह्याद्री अतिथी गृह येथे भेट घेऊन कालच्या मीटिंगसाठी हट्ट धरला व संध्याकाळी शिष्टमंडळ बोलवून सह्याद्री येथे अखेर काल आमदार मा.ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या, प्रयत्नाने जुनी पेन्शन कृती समितीची भेट घडवून आणली आणि मिटिंग यशस्वी केली.
काल ची मिटिंग जवळपास 25 मिनिटाची मिटिंग संपन्न झाली. त्यामध्ये मुखमंत्री साहेबांनी जुनी पेन्शन बाबत सहमत असून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या लोकांवर अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ शासन सकारात्मक विचार करत असून काही तांत्रिक अडचणी सोडवून आम्ही लवकरच निर्णय देऊ असे मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासीत केले. माजी आमदार मा. दत्तात्रेय सावंत, माजी आमदार मा. श्रीकांत जी देशपांडे, सुनील भोर सर, सचिन नलावडे सर, वाले सर, प्रसाद गायकवाड सर, समाधान घाडगे समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात, सविस्तर चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी केली. आंदोलन कर्त्या समन्वय समिती सोबत चर्चा यशस्वी झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पहिले राज्यातील मुख्यमंत्री असतील त्यांनी अतिशय सकारात्मक उत्तर शिष्ट मंडळाला दिले.
यशस्वी झालेल्या चर्चेनंतर समन्वय संघाच्य सहमतीने आझाद मैदानास सुरू असल्याा आंदोलन थांबवले.
तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या सेवानिवृत्त व मृत शिक्षक - शिक्षकेतरांना 31 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार त्वरित लाभ द्यावेत, त्याकरता स्वतंत्र शासन आदेश काढावा अशी ही विनंती केली. तसा आदेश सूचना सचिवांना देण्यात आल्या.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार दत्तात्रय सावंत, सुनील भोर व समन्वय समितीच्या पधिकाऱ्यांनी अपार मेहनत घेतली.