वनिता घुमे अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित .!

भद्रावती (ता.प्र.) - महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सन २०१३-१४ चा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार १मे महाराष्ट्र दिनी भद्रावती येथील वनिता गजानन घुमे यांना प्रदान करण्यात आला.
          महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रपूर येथील ध्वजारोहण च्या मुख्य समारंभात वने व सांस्कृतिक मंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते आमदार सुधाकरराव अडबाले,जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जांसन,पोलीस अधीक्षक परदेशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांचे प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
           वनिता घुमे यांचे महिला व बाल विकास क्षेत्रातील कार्य भद्रावती तालुक्यातील बेलगाव(भु) येथून उत्कर्ष पुरोगामी महिला व बाल कल्याण संस्थेच्या माध्यमातून मागील वीस वर्षांपूर्वी सुरू झाले ते आजतागायत संचालक व समुपदेशक महिला समुपदेशन केंद्र, भद्रावती, जिल्हा समन्वयक राज्य महिला आयोग, स्थानिक महिला तक्रार समिती, सदस्य बालकल्याण समिती चंद्रपूर, तज्ञ मार्गदर्शक/प्रशिक्षक,विविध सामाजिक संघटन अशा विविध पदांवर राहून पिडीत महिला व बालकांकरिता तळमळीने सेवा करीत आहेत.या कार्याची दखल शासनाने घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करून सन्मानित केले. याबद्दल त्यांचे विविध संस्था व संघटना, लोकप्रतिनिधी व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.