अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ.रमणिक एस.लेनगुरे सन्मानित.!

नागपुर (वि.प्र.) : मानवतेसाठी कार्य करणारे डॉं. रमणिक एस. लेनगुरे, ग्रंथपाल, प्रसिद्ध विचारवंत, उत्कृष्ठ समाजसेवक, संशोधक, करीअर व स्पर्धा परिक्षा कॉन्सीलर, नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणारे ग्रंथपाल, वर्ड रिकॉर्ड होल्डर कवी, कवी भुषण सन्मान प्राप्त, डि.लिट ने सन्मानीत, वाचन चळवळीचे पुरस्कर्त, प्रेरणादायी मागदर्शक, हेल्थ कोच तसेच विश्व मानवाधिकार संस्थेचे आंतरराष्ट्रीय सदस्य आहेत. ते ग्रंथालयाच्या लायब्ररी स्कॉलर नामक जरनलचे मुख्य संपादक असून अंत्यत प्रतिष्ठित मानल्या जाणा-या युजीसी केअर व स्कोपस इंडेक्सींग जरनलच्या संपादकीय मंडळात त्यांचा नावाचा समावेश आहे. त्यांना अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांचे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परिक्षा, रोजगार व करीअर मार्गदर्शन संबंधित 2014 पासून खूप मोलाचे कार्य आहे. ग्रंथालयाच्या माध्यमाने अनेक नावीन्यपूर्ण समाजउपयोगी उपक्रम राबवित असल्यामुळे त्यांना अनेक सत्कार व त्यांची अनेक वर्ड बुक ऑफ रेकार्ड मध्ये नोंद घेण्यात आली आहे. व त्यांचे विशेष म्हणजे दि. 25 मार्च 2020 पासून लॉकडावून झाले तेव्हापासून रोज एक कविता या प्रमाणे मानवतेला प्रेरणा देत कोरोना या एकाच विषयावर 1070 पेक्षा जास्त कविता लिहिल्या आणि विविध ऑनलाईन माध्यमाव्दारे जनमानसापर्यंत पोहाचवीत कोरोना काळात लढयासाठी त्यांच्या आशा पल्लवीत केल्या. 
ते ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती रूजावी यासाठी ते नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात. जसे थॉट ऑफ द डे, हॉस्पीटल लायब्ररी, वृद्धाश्रम ग्रंथालय, हेल्थ लायब्ररी, पब्लिक लायब्ररी, घडो विद्यार्थी, ग्रंथालयातून स्पर्धा परीक्षेकडे, एक विचार आपले जीवन बदलू शकतो, व्हावे त्यांच्या समान या संपूर्ण कार्यासाठी त्यांना वर्ड रेकार्ड्सनी त्यांना गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात विविध आणि नावीण्यपूर्ण उपक्रम राबवणारे ग्रंथपाल म्हणून त्यांची ओळख देखील आहे. या संपुर्ण कार्याची दखल घेत मराठी साहित्य मंडळाव्दारे दि. 30 सप्टेंबर 2023 रोजी आयोजीत पहिल्या अखील भारतीय साहित्य संमेलन नारायणा विद्यालयम, नागपूर येथे भव्य अश्या कार्यक्रमात त्यांच्या कार्याला अखील भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक श्री मा. पंडित शंकर प्रसार अग्निहोत्री यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी मा. श्री राजे मुधोजी भोसले, लोकप्रिय नेते, सिनेट सदस्य व समाजसेवक मा. श्री गिरीशजी पांडव, मिसेस यूनिवर्स वर्तिका पाटील, जेष्ठ समाजसेवक रामनारायन मिश्र, संमेलनाअध्यक्ष डॉ. रेखा जगनाडे मोतेवार, 97 व्या अखिल भारतीय साहित्य संलेलनाअध्यक्ष डॉं. रविंद्र शोभणे, अखील भारतीय साहित्य संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉं. जयप्रकाश घुमटकर, जेष्ठ कवयित्री मा. ललिता गवांदे, विदर्भ अध्यक्ष श्री सिद्धार्थ कुलकर्णी, पुर्व विदर्भ अध्यक्ष श्री नरेंद्र माहिते, आएनबीसीएन न्युज चॅनलचे प्रमुख श्री रत्नाकर मुळीक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.