नागपूरात ७०० संगणक परिचालक ताब्यात.!

महाराष्ट्र ग्रामपंचायत संगणक परीचालकाचा मोर्चा नागपूरात ७०० संगणक परिचालक ताब्यात.!

नागपूर (वि.प्र.) : महाराष्ट्र राज्यातील २७८६३ ग्रामपंचायती मध्ये १९४७५ संगणक परिचालक कार्यरत असून शासन त्यांच्या मागण्या कडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे.
मागील १२ वर्षा पासून या प्रकल्पाच्या माध्यमातून संगणक परिचालक शासनाच्या सेवा सुविधा ग्रामपंचायती च्या माध्यमातून दिवस रात्र ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम अतिशय प्रामाणिक पणे करीत असून सुध्दा सदरील संगणक परिचलांकाच्या मागण्या कडे शासन कधी लक्ष देईल याची महाराष्ट्रातील सर्व संगणक परिचालक आतुरतेने वाट पहात आहेत.
यासाठी मागील तीन दिवसांपासून नागपूर येथे आपल्या मागणीसाठी आंदोलन करीत आहे आज  ७०० संगणक परिचालकाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
परिणामी या मानसिक त्रासाला कंटाळून महाराष्ट्रातील संगणक परिचालक आत्महत्या करण्याच्या मानसिकते मध्ये पोहचले आहेत. त्यावेच ज्वलंत उदाहरण म्हणजे नांदेड जिल्हयातील बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथील संगणक परिचालक श्री आंबादास नागोराव पेटेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयातच गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपवली आहे.
त्यामुळे शासनाने संगनक परचलकाची मागणी मान्य करावी असे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".