काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आरक्षण मर्यादा वाढवण्या संदर्भात भूमिका - योगेश केदार

मुंबई (जगदीश काशिकर) : मुळात घटनेमध्ये समता हा नियम आहे व आरक्षण हा अपवाद आहे. अपवाद नियमा पेक्षा मोठा कसा करणार हे बघणे औत्सुक्याचे असेल. आम्ही राहुल गांधी यांच्या वक्तव्या चे स्वागत करतो. परंतु मराठ्यांची आरक्षणाची मागणी ही ५०% च्या आतली आहे. २३ मार्च १९९४ ला हिरवला गेलेला आमचा हिस्सा परत मिळवणार आहोत. त्यावर आम्ही ठाम राहू. 
शाहू महाराजांनी देखील ५०% ची मर्यादा ठेवली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आरक्षणाची मर्यादा ५०% असावी असे अनेक ठिकाणी नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील अनेक निवड्यांमध्ये तीच मर्यादा कायम ठेवली. इंद्रा साहनी खटला सर्वांना माहिती आहे. १५(४) आणि १६(४) अंतर्गत असलेले सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास समाजांना दिले ल्या आरक्षणाची मर्यादा नेमकी कशी वाढवतात हे भविष्यात बघणे औत्सुक्याचे असेल.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.