निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात एक दिवशीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन.!

भद्रावती (वि.प्र.) - निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभाग, प्लेसमेंट अँड करियर कौन्सिलिंग सेंटर व इन्स्टिट्यूट फॉर एडवांस, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सप्लोरिंग व्हेरियस करिअर ऑप्शन अँड पाथवे आफ्टर ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.या एक दिवशीय राष्ट्रीय वेबिनारचे मुख्य डॉक्टर कार्तिक एन. शिंदे, सचिव भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एल. एस. लडके, समन्वयक डॉक्टर ए. डी. दहेगावकर आणि डॉक्टर एन. एस. वाढवे, संयोजक, डॉक्टर जी. आर. बेदरे, सहसंयोजक प्रो. के. वी. भोंगळे उपस्थित होते.
सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एल. एस. लडके यांनी या एक दिवशीय राष्ट्रीय वेबिनारचे प्रास्ताविक करीत आयोजनामाचा हेतू स्पष्ट केला तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर काय करावे व किती संधी उपलब्ध आहेत याविषयी विविध माहिती मिळते असे आपले मत व्यक्त व्यक्त केले.तसेच डॉक्टर कार्तिक एन. शिंदे यांनी या एकदिवसीय वेबिनारला शुभेच्छा देत अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नेहमीच फायदा होतो व त्यांना माहीत नसलेल्या फील्ड विषय सुद्धा ते सुपरीचीत होतात व निश्चितच या गोष्टीचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून ममता मारर मॅडम उपस्थित होत्या त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना बी.एससी. झाल्यानंतर आय. आय. टी. मध्ये कसे जावे तिथे जाण्यासाठी "जाम" या परीक्षेची तयारी कशी करावी व त्याच पद्धतीने भारतातील विविध नावाजलेल्या यूनिवर्सिटी मध्ये ऍडमिशन घेत असताना मार्क किती लागतात, कॅटेगिरी वाईस सिटी किती असतात, त्याचा कशा पद्धतीने अभ्यास करावा आणि कोणत्या विषयाला प्राधान्य द्यावे याविषयी महत्त्वाची अशी माहिती पी.पी.टी.च्या माध्यमातून दिली.या एक दिवशी राष्ट्रीय वेबिनारला एकूण 52 विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.या राष्ट्रीय वेबिनारला यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक डॉक्टर अजय दहेगावकर, प्राध्यापक डॉक्टर नथू वाढवे, प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र बेद्रे, प्राध्यापक कुलदीप भोंगळे, प्राध्यापक डॉक्टर कार्तिक शिंदे, प्राध्यापक डॉक्टर खादरी, प्राध्यापक संदीप प्रधान या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.