बल्लारपुर (का.प्र.) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश भैय्या सोमानी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बल्लारपूर तालुका ग्रामीण यांच्याकडून मातोश्री वृद्धाश्रम विसापूर येथे फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राकेश भैय्या सोमानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रशांत भाऊ झांबरे जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सुमित भाऊ डहाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बल्लारपूर तालुका कार्याध्यक्ष तनवीर भाऊ शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस बल्लारपूर तालुका अध्यक्ष ग्रामीण योगेश भाऊ निपुंगे, विसापूर शहर अध्यक्ष प्रदीप भाऊ लांडगे माजी नगरसेवक सरफराज भाई आणि असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.