17 मार्चला सातवे स्मृतिगंध काव्यसंमेलन .!

डॉ.प्रतिमा इंगोले यांच्या अध्यक्षतेत भद्रावतीत दिनांक 17 मार्चला सातवे स्मृतिगंध काव्यसंमेलन .!
स्व.विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन.!

भद्रावती (वि.प्र .) : स्व.विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान भद्रावतीच्या वतीने स्थानीक श्री मुरलीधर पाटील गुंडावार सभागृह येथे रविवार दिनांक 17 मार्च 2024 ला सातवे स्मृतिगंध काव्यसंमेलन संपन्न होत आहे. नवोदीत व प्रथितयश काव्यप्रतिभेचा सन्मान आणि मराठी काव्य रसिकांच्या आस्वादकतेस प्रोत्साहन देण्यासाठी ह्या संमेलनाचे प्रयोजन आहे. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिध्द कवयित्री डॉ. प्रतिमा इंगोले दानापूर (अकोला), यांच्या अध्यक्षतेखाली प्रख्यात कवयित्री डॉ. संध्या पवार नागपूर, यांच्या शुभहस्ते या नियोजीत संमेलनाचे उद्घाटन सकाळी ठिक 10.30 वा. संपन्न होत आहे. यावेळी प्रमूख अतिथी म्हणून ज्येष्ठ सहित्यिक आचार्य ना.गो.थुटे वरोरा, अनंत भोयर, सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार व कृषी तज्ज्ञ काटोल, डॉ. प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी प.स. भद्रावती, अमित गुंडावार सामाजिक कार्यकर्ते भद्रावती, ईत्यादी मान्यवर उपस्थित राहतील. भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर या काव्यसंमेलनाचे निमित्ताने विशेष अतिथी म्हणून यावेळी उपस्थित असतील.
प्रस्तूत काव्य संमेलन कवी आणि कवितेचा शब्द-भाव-अनुभूतीचा आनंदमेळाच असून, या एकदिवसीय काव्यसंमेलनात दोन कविसंमेलने व एका गझल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. भरगच्च चार सत्रांमध्ये होत असलेल्या या साहित्यसोहळ्यात वाङ्मयीन चिंतनासोबतच काव्यामृताचे सिंचन होणार आहे.संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीत कवींचे बहारदार कविसंमेलन संपन्न होत आहे. या प्रसंगी नामवंत कवी डॉ. विजय सोरते नागपूर,इरफान शेख चद्रपूर, धनंजय साळवे चंद्रपूर या मान्यवरांची उपस्थिीती राहणार आहे. विदर्भातील प्रतिभाशाली कवी या संमेलनाला उपस्थित राहणार असून, मराठी काव्यरसिकांना ही एक मोठी पर्वणीच असणार आहे. तिसऱ्या सत्रात, प्रख्यात गझलकार लोकराम शेंडे बुटीबोरी, यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीत कवींची गझल मैफिल रंगणार आहे. या मैफिलीमध्ये प्रतिथयश गझलकार जयवंत वानखेडे कोरपना, राम रोगे नांदाफाटा, सुरेश शेंडे गडचिरोली, गौतम राऊत ब्रम्हपूरी यांची उपस्थिती राहणार आहे. या निमित्ताने बहारदार गझलांचा आस्वाद गझल रसिकांना घेता येणार आहे. संमेलनाच्या चौथ्या सत्रात प्रख्यात कवयित्री गीता देव्हारे-रायपुरे चंद्रपूर, यांच्या अध्यक्षतेखाली खुले कवी संमेलन संपन्न होत आहे. खुल्या कविसंमेलनात देखील प्रतिथयश व नवोदीत काव्यप्रतिभेची जुगलबंदी काव्यरसिकांना अनुभवता येणार आहे. या प्रसंगी ज्येष्ठ कवी दीपक शिव आनंदवन, सिमा भसारकर चंद्रपूर, गोपाल शिरपूरकर चंद्रपूर, जयंत लेंझे सिंदेवाही, आरती रोडे वरोरा, वसंत ताकघट चंद्रपूर, रमेश भोयर भद्रावती, देवेंद्र निकुरे नागभीड हे मान्यवर कवी मंचावर उपस्थित असतील.
स्मृतिगंध काव्यसंमेलनाचे सदर आयोजन हे विदर्भस्तरीय असून, विदर्भातील प्रख्यात साहित्यिक व कवींचा मेळा या निमित्ताने भद्रावती नगरीमध्ये रंगणार आहे. मायबोली मराठी व मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या काव्यरसिकांनी तसेच नवोदितांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्मृतिगंध काव्य संमेलनाचे संयोजक प्रवीण आडेकर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.