आदिवासींना कपडे वाटप करुन वाढदिवस व महिला दिन साजरा .!

बल्लारपुर (का.प्र.) : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आज आदिवासी पाड्यावर जाऊन महिला दिनाचे दिवशी गरजवंत महिलांना व पुरूषांना भोईराज कॅलेंडर निर्माता डॉ रतनलाल तायडे भोई ग्रामपंचायत सदस्य यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महिला पत्रकार सौ लक्ष्मीबाई गावंडे यांच्या हस्ते आदिवासी महिलांना व मान्यवरांच्या हस्ते माणुसकीच्या भिंतीवरील कपड्यांचे, लहान मुलांना कपडे व खेळण्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री. देविदास भास्कर सर यांनी केले. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध इंजिनिअर श्री रवी पवार साहेब होते तर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक देशोन्नती चे ज्येष्ठ पत्रकार श्री रामदासजी काळे, पत्रकार श्री गणेशराव वाकोडे,हे होते. संचालन लिव्हिंग ऑफ आर्ट चे श्री अनिल रोकडे यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री उपासे यांनी केले नंतर आदिवासी मुलांना खाउचा वाटप करुन कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.