जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे पोक्सो कायदेविषयक मार्गदर्शन .!

बल्लारपुर (का.प्र.) : जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे पोक्सो कायदेविषयक मार्गदर्शन दिनांक: 26/02/ 2024 रोजी पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत (मुख्याध्यापक), प्रमुख मार्गदर्शक अॅड. आय. आर. सय्यद अध्यक्ष तालुका अधिवक्ता संघ बल्लारपूर, अॅड. राजेश लिंगे बल्लारपूर तर प्रमुख उपस्थिती सौ. सारिका शेंडे उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ यांची होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंचावर उपस्थितांचे गुलाबकळीने स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात पोक्सो कायद्याबद्दल माहिती देताना शाळेचे शिक्षक आर. बी. अलाम यांनी " बॅड टच आणि गुड टच " याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक अॅड. राजेश लिंगे यांनी पोक्सो कायद्यातील विविध कलमा, कन्सेट आदीबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी जागरूक राहिले पाहिजे असे सांगितले.
तसेच अॅड. आय. आर. सय्यद अध्यक्ष तालुका अधिवक्ता संघ बल्लारपूर यांनी नॅशनल चिल्ड्रन प्रोटेक्शन पॉलिसी अनुसार पोक्सो कायद्याबद्दल माहिती दिली. अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सांगितले की, पोक्सो कायद्यात पीडीतेला न्याय कसा मिळेल याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. संचालन एस. एन. लोधे मॅडम व आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमात आर. के. वानखेडे, एम. डी. टोंगे, यु. के. रांगणकर आदी शिक्षक, वामनभाऊ बोबडे, गणेश चंदावार (बाबू), जगदीश कांबळे, इंद्रभान अडबाले आधी शिक्षकेतर कर्मचारी, रंजना शर्मा, वर्षा ठाकरे, पुरन सिंह, सुषमा दुर्गे, वर्षा मांदाळे, सुकेशनी निमकर, अमोल वेले, महेंद्र भडके, पौर्णिमा पाटील आदी पालक तसेच विद्यार्थी वृंद उपस्थित होते.

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप .!

बल्लारपुर : जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दिनांक: 28/02/ 2024 रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत (मुख्याध्यापक), प्रमुख पाहुणे यु. के. रांगणकर (वर्गशिक्षक दहावी), एम. डी. टोंगे (वर्गशिक्षक नववी), प्रमुख उपस्थिती आर. के. वानखेडे, आर. बी. अलाम यांची होती. प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
मंचावर उपस्थितांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात शाळेचे शिक्षक आर. बी. अलाम यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना सूचना बाबत मार्गदर्शन केले. 
दहावीचे वर्गशिक्षक यु. के. रांगणकर सर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना स्वतःची प्रगती करण्यासाठी विज्ञानाची कास धरण्याची आवश्यकता आहे.
अध्यक्षीय भाषण करताना बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी सांगितले की, शाळेमध्ये शिकवितांना शिक्षक विद्यार्थ्यांचे पितृत्व आणि मातृत्व स्वीकारतो. व त्यास योग्य घडणीतून वळण लावण्यासाठी मदत करतो. सुज्ञ नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा, लक्ष ग्रुप बल्लारपूर तर्फे घेण्यात आलेली सामान्य ज्ञान स्पर्धा, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, एलिमेंट्री परीक्षा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन पटावर आधारित निबंध स्पर्धा आदी बाबत प्रमाणपत्र मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
संचालन एस. एन. लोधे मॅडम व आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.कार्यक्रमात आर. के. वानखेडे, एम. डी. टोंगे आदी शिक्षक, वामनभाऊ बोबडे, गणेश चंदावार (बाबू), जगदीश कांबळे, इंद्रभान अडबाले आदी शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.