गोंडवाना विद्यापीठात झाडीबोली नाट्यसंमेलनात एकांकिका स्पर्धा व एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन.!
भद्रावती (वि.प्र.) : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मार्फत "मराठी भाषा गौरव दिना"चे औचित्य साधून झाडीबोली नाट्य संमेलन दिनांक ५ मार्च २०२४ ला आयोजित केले आहे. झाडीबोली नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदी चंद्रपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, नाट्यकर्मी डॉ श्याम मोहरकर यांची निवड करण्यात आली.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग द्वारा आयोजित झाडीबोली नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी एकांकिका स्पर्धा व एकपत्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. दिनांक ५ मार्च २०२४ ला होणाऱ्या या झाडीबोली नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, जेष्ठ नाट्यकर्मी, माजी प्राचार्य डॉ श्याम मोहरकर हे आहेत, तर स्वागताध्यक्ष डॉ प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे आहेत. या नाट्यसंमेलनाचे उद्घाटक पद्मश्री मान. डॉ. परशुराम खुणे, प्रमुख अतिथी अनिरुद्ध वनकर, प्रसिद्ध नाट्य कलावंत व गायक , डॉ श्रीराम कावळे, प्र- कुलगुरू , गोडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ ए. एस. चंद्रमौली, अधिष्ठता मानव विज्ञान विद्या शाखा, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांची प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
झाडीपट्टीतील सामाजिक समस्या, भाषा, बोली, आचार- विचार, संस्कृती यांची ओळख व अभ्यास विद्यार्थ्यांना करण्याच्या दृष्टीने आणि झाडीपट्टी रंगभूमीचे जतन व संवर्धन करणे या उद्देशाने "मराठी भाषा गौरव दिना" निमित्त गोडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे आयोजित या नाट्यसंमेलनात गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने दिनांक ५ मार्च २०२४ रोजी झाडीपट्टी झाडीबोली नाट्य संमेलन होत आहे.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे आयोजित झाडेबोली नाट्य संमेलनात विद्यापीठात अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होवून, आपली कला प्रदर्शित करावी व नाट्य संमेलनाचा आनंद मोठ्या संख्येने घ्यावा. असे आवाहन डॉ अनिल हिरेखण, कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ श्याम खंडारे, डॉ निलकंठ नरवाडे, डॉ सविता गोविंदवार, डॉ हेमराज निखारे प्रा. अमोल चव्हाण पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग गडचिरोली मार्फत करण्यात आले आहे.
डॉ. ज्ञानेश हटवार आकाशवाणीवर.!
भद्रावती येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ ज्ञानेश हटवार यांची "मराठी भाषा गौरव दिनानिमित्त" आकाशवाणी वरून ऊद्या दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ११ वाजता मुलाखत प्रसारित झाली.
२७ फेब्रुवारी हा दिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक, साहित्यिक व पत्रकार क्षेत्रात सक्रिय असलेले मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ ज्ञानेश हटवार भद्रावती यांची निवेदिका हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणी केंद्रावरून उद्या दिनांक २७ फेब्रुवारीला २०२४ ला सकाळी ११ वाजता प्रसारित झाली.