नांदेड़ : "आया समय, उठो तुम नारी युग निर्माण तुम्हें करना है, आजादी की खुदी नींव में तुम्हें प्रगति पत्थर भरना है, अपने को कमजोर न समझो जननी हो, सम्पूर्ण जगत की गौरव हो ,अपनी संस्कृति की आहट हो ,स्वर्णिम आगत की तुम्हें नया इतिहास देश का अपने कर्मों से रचना है।"
आठ मार्च जागतिय महिला दिन आपण अनेक यशस्वी महिलांचा सन्मान या दिवशी करतोत त्यांच्या कार्याला सलाम ,मुजरा करतो ;पण वाचक प्रत्येक महिलाही विशेष गुणांनी जन्माला आलेली असते. प्रत्येक महिलेचा सन्मान हा नेहमीच व्हायला पाहिजे .आजच्या खासच्या दिवशी मी पाहिलेल्या प्रखर, तेजस्वी आणि संकटावर मात करून यशस्वीपणे उभे असलेल्या त्रिशक्तींची ओळख आपल्याला करून देणार आहे.
शरीरात दोन किडनी असतात आणि एका किडनीवर सुद्धा माणूस फक्त जगू शकतो हे जेंव्हा डॉक्टर नी सांगितलं तेंव्हा मीता कपूरने एक क्षणाचाही विचार न करता आपल्या पतींना ज्यांच्या दोन्ही किडनी ज्या निकामी झाल्या होत्या त्यांना आपली एक किडनी देऊन त्यांना जीवदान देण्याचे ठरविले. खरंतर हा निर्णय खूपच अवघड होता त्यांच्यासाठी. वयाच्या 50 व्या वर्षी आपला एक अवयव देऊन स्वतःला आरोग्यदायी ठेवणे खरच अवघड आहे; परंतु या त्यांच्या निर्णयामुळे काही वर्ष त्यांच्या पतींना जीवनदान मिळाले खरे ; पण शेवटी विधात्याची मर्जी .त्यांचे पती त्यांना सोडून देवा घरी गेले. त्या डगमगल्या नाहीत. दुर्गादेवी सारखी ताकद घेऊन परत त्या नोकरीसाठी सज्ज झाल्या .आपल्या एका किडनी सोबत अशा निर्भीड मीता कपूर संकटांना न घाबरून येणाऱ्या वेळेला सामोरे जाण्याची ताकद खरच जबरदस्त इच्छाशक्तीनेच मिळते.
लग्न झाल्यावर तेही घरच्यांच्या विरोधात जाऊन अवघ्या सात वर्षाचा संसार सांभाळून पदरी एका मुलीचा सहवास असणारी प्रतिमा आठवली मला .अचानक नवऱ्याच्या मृत्यूमुळे कोसळणारी प्रतिमा परत जोमाने आपल्या मुली सोबत आनंदाने जगायला शिकली; पण काळाने तिच्या मुलीलाही तिच्यापासून हिरावून घेतलं .काय दुःख असेल त्या मातेचं! जगावं कशासाठी? ना आधार ,ना प्रेम अशा अवस्थेत सुद्धा घरच्यांची साथ नसूनही ती परत अगदी हिमतीने स्वःताच्या इच्छाशक्तीच्या बळावर उभी राहण्याचा प्रयत्न करीत आहे. न विसरणाऱ्या गोष्टींना सोबत घेऊन ,त्यांच्या आठवणींना न कोटाळून बसता ते माझ्यासोबतच आहेत अशी धारणा करून तिने पुढे पाऊल उचलले. जीवनाकडे काही झालं तरी त्या दुःखांना कवटाळता पुढे एकटे चालून अनेक मार्गांवर दुसऱ्यांना साथ देणारी प्रतिमा खरंच कौतुकास्पद आहे. घरातील परिस्थिती नाजूक आणि अशातच लहान वयात आलेले अपंगत्व अशी ही गझाला अंजुम; पण शारीरिक व्याधी असूनही तेवढीच ताकदीने त्या व्याधीवर मात करून पुढे चालणारी ,घरातील मुलगी नसून एक कर्तबगार मुलगा म्हणून सर्व जबाबदाऱ्या उचलून घराला पुढे नेणारी अंजुमच्या ताकदीवर खरंच कौतुक करावंसं वाटतं .भावंडाचे शिक्षण, लग्न या सर्व जबाबदाऱ्या तिने पार पाडल्या. स्वतः शिकून चांगली नोकरी करून सतत दुसऱ्यांना मदत करणारी अबला कशी असेल. मुळात तिने स्वतःला कधीच अपंग समजले नाही हीच तिची प्रखर इच्छा शक्ती म्हणावी लागेल.
वाचक ,अशा अनेक महिला आपल्या समाजात वावरतात. त्यांना या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आणि मानाचा मुजरा. असे म्हणतात की सर्वात जास्त सहनशक्ती ही महिलांमध्ये असते म्हणूनच महिला वंदनीय आहेत. काळालाही परत फिरवण्याची ताकद महिलांमध्ये आहे म्हणूनच म्हणतात ना
" मुस्कुरा कर दर्द भुला कर रिश्तो मे बंद थी दुनिया सारी
हर पग को रोशन करने वाली वो शक्ती है एक नारी ।"
स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर©️ 7420918198 नांदेड.. त्रिशक्ती..!
इन्फ्लुइन्सर बुक ऑफ रेकॉर्ड विजेत्या सौ स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर यांना 2024 चा राष्ट्रीय नारीभुषण एक्सलन्स पुरस्कार जाहीर.!
नांदेड (वि.प्र.) : दरवर्षी इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन एम. व्हि. एस. जे . च्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्धल अनेक मान्यवरांना सन्मानित केले जाते .यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय कार्य करणान्या महिलांना 'राष्ट्रीय नारीभुषण एक्सलन्स पुरस्काराने' सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच चिन्नपट आणि लिखाण या क्षेन्नातील प्रदीर्घ, अनमोल व अतुलनीय योगदानाबद्दल नांदेडमधील इन्फ्लुइन्सर बुक ऑफ रेकॉर्ड विजेत्या सौ स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर यांना 2024 चा "राष्ट्रीय नारी भुषण एक्सलन्स"पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
तर या वर्षीच्या जागतिक महिला दिनानिमित्त चे औचित्य साधून त्यानी "राष्ट्रीय नारीभूषण एक्सलन्स पुरस्कार" नांदेडमधील इन्फ्लुइन्सर बुक ऑफ रेकॉर्ड विजेत्या सौ स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर यांना 2024 चा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.उपरोक्त संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 'इनोव्हेटिव्ह नारीशक्ती सन्मान संमेलनाचे' आयोजन रविवार, दिनांक १० मार्च, २०२४ रोजी, संध्याकाळी ६.०० वाजता नवीन पनवेल (पूर्व) मुंबई याठिकाणी करण्यात आलेले आहे.ह्या वेळी त्या प्रमुख अतिथी / सन्मा. अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. असे या संस्थेचे संस्थापक एन. डी. खान यांनी कळविले आहे.