"स्वच्छता ही सेवा" उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन.!

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात "स्वच्छता ही सेवा" उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन.!

भद्रावती (वि.प्र.) : स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर यादरम्यान चालू असलेल्या “स्वच्छता ही सेवा-२०२४” या उपक्रमांतर्गत स्वच्छतेवर आधारित रॅली, स्वच्छता शपथ, स्वच्छता अभियान, प्लास्टिक निर्मूलन उपक्रम तसेच स्वच्छता मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमांतर्गत दि. 22 सप्टेबर 2024 ला महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच प्लास्टिक निर्मूलन उपक्रम राबविण्यात आला. प्लॅस्टिक बॉटल तसेच निरुपयोगी प्लॅस्टिक वस्तू जमा करून महाविद्यालयातील प्लॅस्टिक कलेक्शन ट्यांक मध्ये जमा करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच रासेयोचे स्वयंसेवक उपस्थित होते.
दि. 27 सप्टेबर 2024 ला स्वच्छता शपथ घेण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच रासेयोचे स्वयंसेवक उपस्थित होते.
दि. 1 ऑक्टोबर 2024 ला स्वच्छता ही सेवा या अभियानाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच स्वच्छतेचा व मानवी आरोग्याचा कसा संबंध आहे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक निर्मूलन उपक्रम राबवण्याचे तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ राखून आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे यांनी केले. 
तसेच दि. 1 ऑक्टोबर 2024 ला स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत नगर परिषद भद्रावतीच्या हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता अभियान तसेच प्लास्टिक निर्मूलन उपक्रम राबविण्यात आला. तसेच दि. 1 ऑक्टोबर 2024 ला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा- 2024 या अभियाांतर्गत स्वच्छता वर आधारित रॅली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे यांच्या नेतृत्वाखाली भद्रावती शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली. तसेच रस्त्याच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ करण्यात आला. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित घोष वाक्य म्हणुन समाजात जनजागृती करण्याचे काम केले.
दि. 2 ऑक्टोबर 2024 ला राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अपर्णा धोटे व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे उपस्थित होते. सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचा पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आपले विचार व्यक्त करीत या कार्यक्रमाच्या आयोजना मागचा हेतू स्पष्ट केला. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. अपर्णा धोटे यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या परिसरात एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ केला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉक्टर अपर्णा धोटे, डॉक्टर राजेश हजारे, डॉक्टर किरण जुमडे, डॉक्टर अजय दहेगावकर, डॉक्टर प्रवीण कुमार नासरे, डॉक्टर नरेंद्र हरणे, डॉक्टर एम. एन. खादरी, डॉ. नथू वाढवे, प्रा. संदीप प्रधान, प्रा. कुलदीप भोंगळे, प्रा. Lt. सचिन श्रीरामे, प्रा डॉ. शशिकांत शित्रे, श्री शरद भावरकर व श्री प्रमोद तेलंग व एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांनी यांनी अथक परिश्रम केले. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.