ज्योतिबा विद्यालय येथिल शिक्षिका महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित .!
नागपुर (वि.प्र.) : बी द चेंज फाउंडेशन शिर्डी जिल्हा अहील्यानगर महाराष्ट्र द्वारा शिर्डी येथे दिनांक २८/०९/२०२५ रोजी आयोजित महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कारांनी नंदनवन नागपूर येथील ज्योतिबा उच्च माध्यमिक विद्यालयाची शिक्षिका सौ.सारिका अनिल घोडमारे तब्बत३१ वर्षा पासून विद्यार्थ्यांकरिता विभिन्न सत्कारणीय कार्य करीत आहे. आणि आताही करीत आहे. आज पर्यंत हजारों विद्यार्थी त्यांनी घडविले आहे. डॉक्टर इंजिनिअर शासकीय कर्मचारी इत्यादी महत्वपूर्ण पदावर त्यांचे! शिकविलेले विद्यार्थी आज विभिन्न क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या कर्तृत्वाचा खऱ्या अर्थाने आज सन्मान झाला आहे या करता त्यांना भरपूर अभिनंदन प्राप्त होत आहे.असे समाजसेवी राहूल जी गौर यांनी माहितीत सांगितले आहे.
