ज्योतीबा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे जागतिक महिला दिन सोहळा उत्साहात संपन्न .!
नागपुर (वि.प्र.) : लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था संचालित ज्योतिबा माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, नंदनवन येथे आज जागतिक महिला दिनाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी तरुण भारत च्या संपर्क पेपर च्या प्रमुख माननीय श्रीमती गौरी सरनाईक मॅडम तसेच पोलीस उपनिरीक्षक श्रीमती उर्मिला पोहणे आणि शीला मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भारत देशातील प्रसिद्ध महिला लता मंगेशकर, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, अशा महान व्यक्तिमत्वाची वेशभूषा करून त्यांच्या अतुलनीय कार्याला उजाळा दिला. प्राचार्या अरुणा कडू यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्त्रीशक्तीवर आधारित कविता ऐकवली व काव्यमय मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक श्री वांदे आणि श्री चोपडे सर आणि सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. महिला पालकांचा सत्कार आणि महिला मेळावा घेऊन त्यांच्यासाठी विविध खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.सूत्रसंचालन श्री जैन सर यांनी केले.
