मुंबई (जगदीश काशिकर) : मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने छोटेखानी भाषणही केले. महाराष्ट्रातील ओबीसी समाज बांधवांनी काठी अन् घोंगडी देऊन त्यांचा सन्मान केला. या राज्यातील मराठा आणि ओबीसी बांधवांची सामाजिक वीण किती विलक्षण आहे हेही आज दिसून आले. मी अनेक वर्षांपासून श्रीकांत दादांचा वाढदिवस साजरा करत असतो. 2014 ला ते पहिल्यांदा निवडून दिल्लीत आले तेंव्हापासून आमची ओळख आहे. काही वर्षांपासून मराठ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाची भूमिका त्यांच्या वडिलांच्या म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधात घेत आलो तरी आमचा संवाद बंद झाला नाही. मी समाजासाठी विरोध करतो त्यामुळे ती भूमिका समजून घेऊन मानाचा मोठेपणा ठेवत तेही प्रेमाने वागतात. तेवढी राजकीय प्रगल्भताया पिता पुत्रांनी ठेवली आहे.
मुख्यमंत्र्यांचे ओसडी मंगेश चिवटें यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित केले होते. शेकडो बालकांचे अनेक दुर्धर आजारांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्यात त्यांनी मला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. हे पवित्र कार्य समजून मीही उपस्थित झालो. राज्याच्या राजकारणात मोठे भविष्य श्रीकांत शिंदे दादांना लाभावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्याही हातून देशाची अमूल्य सेवा घडावी हीच पुन्हा एकदा प्रार्थना. यावेळी ठाण्याचे पालक मंत्री शंभूराजे देसाई, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, झाडी डोंगर फेम आमदार शहाजी बापू पाटील, मंगेश चिवटें, बाळासाहेब किसवे, चंद्रकांत भोसले, प्रीतम माने, व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.
विधान परिषदेवरील धनशक्ती वरचढ बरखास्त करा विधानपरिषद - अजय सिंह सेंगर
मुंबई:- विधान परिषदेची निर्मिती ही बुद्धिजीवी आणि तज्ञ व्यक्तींकरिता झालेली आहे. मात्र आपल्या राज्याचे दुर्दैव विधान परिषदेवरील धनशक्ती वरचढ चढल्या आहेत. ज्यांना कवडीचे सुद्धा अक्कल नाही असे करोडपती धनवान व्यक्ती विधान परिषदेवर निवडून येत आहे म्हणून राज्यातील विधान परिषद बरखास्त करा असे परखंड मत महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केली. पुढे ते म्हणतात की राजकीय पक्ष सुद्धा निष्ठावतांना व बुद्धी जीवि वर्गांना वगळून धनवान व्यक्तींनाच विधान परिषदेचे तिकीट देत आहे. विधान परिषदेवर बुद्धिजीवी वर्ग अर्थात पत्रकार, अर्थतज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, शास्त्रज्ञ अशा व्यक्तीची अपेक्षा असते. मात्र आज राजकीय पक्ष बुद्धीवर्गाकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. मग विधान परिषद ची गरज काय? पाच करोड ते पन्नास करोड हे विधान परिषदे करिता रेट ठरलेले आहे. म्हणून महाराष्ट्र राज्यांमध्ये विधानपरिषद काही गरज नाही म्हणून राज्यात विधान परिषद बरखास्त करायला पाहिजे,अनेक राज्यांमध्ये विधानपरिषद नाही हे या ठिकाणी लक्षात घेणे जरुरी आहे असे महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी आपले विचार प्रसिद्धी माध्यमा समोर व्यक्त केले.
विधान सभेवर निवडून आलेले हे शंभर टक्के धनवान उमेदवार असतात विधानसभेमध्ये पारित केलेले बिल अथवा कायदे हे मंजुरी करिता विधानपरिषद मध्ये पाठवले जातात मात्र विधान परिषदेमध्ये बुद्धिजीवी वर्ग नसल्याने येथील विधान परिषदेचे सदस्य अर्थात आमदार बैलासारखी मान हलवून समर्थन करतात. त्या कायद्यावर चर्चा सुद्धा करत नाही, चर्चा याकरिता करत नाही कारण ते बुद्धिजीवी नसतात व हे सदस्य विधान परिषदेत निवडून आलेला खर्च वसूल करण्यातच व्यस्त असतात त्यांना विकासाची काय लेणं देणं नसतात.
विधान परिषदेचे बहुतांश आमदार हे 15 ते 16 टक्के दराने आपले आमदार फंड विकतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही त्या विधान परिषदेच्या या सदस्याच लक्ष अर्थपूर्ण कमाई वर असते असेही सेंगर म्हणतात. जर महाराष्ट्र राज्यांमध्ये विधान परिषद बरखास्त केली तर शासनाचे कमीत कमी 500 करोड रुपये नक्कीच वाचू शकते असे ते म्हणतात .. गेल्या वीस वर्षापासून राज्यामध्ये तीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली यावर तोडगा विधान परिषदेचे सदस्य उपाय काढू शकले नाही मग काय कामाची ही विधान परिषद असा सवाल त्यांनी केला.पुढे ते म्हणाले की तत्कालीन माननीय राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियुक्त आमदारांची नावे शिफारस केलेल्या मध्ये घोडेबाजार झाल्याने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी 12 राज्यपाल नियुक्त आमदार पदाला मान्यता दिलेली नाही.